जै म्हाराष्ट्र वेळेवर साहेब,
पैल्याछूट सांगून टाकतो, वरच्या हेडलाइनमदे, तुमच्या नावामदे आणि खालच्या मजकुरात ज्या काय पेलिंग मिष्टेक असतील, त्या आपण मोठ्या मनाने पोटात घालाव्यात. साहेब, सपष्ट सांगतो, आपण काय हायली वेज्युकेटेड नाय. तशे आपण दोन विंग्रेजी शाळांच्या कमिटीवर आहोत आणि तिस-या- ते काय आय माय बरंच काय बोर्डाचं नाव हाय ना- त्या शाळेचं प्रपोझल पेण्डिंग आहे.. पण ती आमच्या तीन सायबांची कृपा. थोरले साहेब, धाकटे साहेब आणि छोटे साहेब. या तिघांच्या आशीर्वादानेच आपण ही पोग्रेस केलेली आहे. (प्रायवेटमध्ये सांगायची गोष्ट म्हण्जे तुमच्या कॉप्रेशननी छोट्या सायबांनी विद्यापीटात जो काय धमाका केलाय, त्यानंतर आता आमच्या आशीर्वादाच्या यादीत छोटे साहेब फिक्स झाले बरं का.)
तर सांगत काय होतो की तुम्ही ही अॅक्शन घेतल्यामुळे आपण तर धाकट्या साहेबांना सांगून टाकलं की दस-याच्या मेळाव्यात वेळेवर साहेबाचा सत्कार झाला पायजे जनसागराच्या साक्षीनं. उद्या मंत्रालयावर भगवा फडकला की वेज्युकेशन मिनिष्टर पन आपले वेळेवर साहेबच झालेच पायजेत. साहेबांनी जी काय पॉम्ट अॅक्शन घेतली तिच्यामुळेच आपला मुंबईतला मराठी माणूस वाचणार आहे, त्याचबरोबर हिंदू धर्म वाचणार आहे, झालंच तर भारत देश त्या पाकड्यांपासून वाचणार आहे, होलसेलमदी सांगायचं, तर सगळी पृथ्वीच वाचणार आहे. (साहेब, हे जरा ज्यादाच आहे, याची मला पण कल्पना आहे. पण, आमच्या तीनपैकी कोनत्याही सायबानी काहीही केलं, तरी आम्ही येवढं सगळं बोलतोच. अहो, धाकट्या साहेबांनी आकाशातनं किल्ल्याचा फोटो काढला, तरी आम्ही हे सगळं पुराण लावतोच. तुम्ही तर खरोखरच सॉलिड काम केलंय.. हे लाष्टचं आपल्यातुपल्या प्रायवेटमध्येच बरं का!)
तर सांगत काय होतो वेळेवर साहेब, ही मुद्दा सोडून पाल्हाळ लावायची सवय मला मेळावा ऐकल्यापासून लागली. म्हण्जे आत्ता मी तुम्हाला सांगत होतो ते हे नाय, सांगत असं होतो की हा साला मेस्त्री. कुठे रंधा मारायचा तो मार. खिळे ठोक. पालिश कर. हे मेस्त्रीकाम सोडून बुक लिवायच्या फंदात कशाला पडला हा पारोसा पारशी? फुकट साला आमच्या छोटय़ा सायेबाच्या भेज्याला तरास? त्यांनी सोता बुक न वाचताच अॅक्शनचा इशारा दिला ती गोष्ट वेगळी! पण, बुक वाचायचा ठरवला असता तर त्यांना किती हेडॅक झाला असता?
ह्या गोष्टीवर- बरं का साहेब- मी तीन रात्र विचार केला. खोटा नाय. कुरकुंडेश्वरी मातेशपथ. तशी आपल्याला विचार करायची पॅक्टिस नाय. तरी पण आपण जोर लावून विचार केला की ह्या सगळ्या लफड्याचा मेन पॉइंट काय हाय?
अखेर आज सकाळी मशेरी लावून भांड्यावर बसलेलो असताना टूब पेटली आणि बाहेर आल्याबरोब्बर (हात सोच्छ धुवून) तुम्हाला लिहायला बसलो. अजून पैला चा पन पिलेलो नाही. तेव्हा पेलिंग मिष्टेक माफ करावी. तर सांगत काय होतो, की एक जण बुक लिवनार, आमचे साहेब ते न वाचता त्याच्यावर ऑब्जेक्शन घेनार, मग तुम्ही ते बॅन करणार, ह्या सगळ्या लफडय़ात मेन पॉइण्ट काय असंल, तर ते तुमचं विद्यापीट.
अहो, हे विद्यापीट नसतं तर ना तो मेस्त्री शिकला असता, ना त्याच्या डोस्क्यात बुकं लिवण्याचा किडा घुसला असता, ना फुडचा सगळा किचाट झाला असता. पॉइण्ट हाय का नाय साहेब? आपण काय वेज्युकेशनच्या विरोधात नाय. वेज्युकेशन नाय तर देशाचा पोग्रेस होणार नाय. शाळेत एबीसीडी, अबकड, तिसापर्यंतचे पाढेबिढे सगळ्यांना शिकवलं पायजे. पन सगळ्यांना पुढच्या शिक्षणाची गरज काय? कशाला ष्टुडंट लोकांनी असली घाणेरडी पुस्तकं वाचायची? काय ग्यान मिळणार आहे त्यातून? कॉम्प्युटर-बिम्प्युटर शिकवा. पेशंट कापायला शिकवा. पूल पाडायला शिकवा. असं बिनकामाचं शिक्षण काय उपयोगाचं? आता मला सांगा, आम्ही कुठं कालेज शिकलोय? पण, आज साहेबांच्या- तिन्ही साहेबांच्या बरं का- आशीर्वादानं आपल्या तीन स्कॉर्पिओ हायेत, दोन मारुत्या हायेत आणि होंडासिटी वेगळी. वेज्युकेटेड माण्साकडं हाये का हे सगळं? आणि हायर वेज्युकेशनने माणूस तुमच्यासारखा समजदार होईल याची गॅरंटी काय? मग नसती झंझट ठेवायची कशाला? तर मी काय सांगतो साहेब, छोट्या साहेबांचा आदेश आल्याबरोबर तुम्ही जसं ते बुक तडकाफडकी बॅन करून टाकलंत ना, तसाच आता फटाफट आणखी एक आदेश काढा आणि आपलं सरकार येईपर्यंत ते विद्यापीट बंद ठेवा.
(साहेब, नोकरीची चिंता करू नका. आमच्या शाळेवर तिसरी ‘फ’च्या शिक्षकाची जागा रिकामी आहे. पगार-बिगार सोडा हो. तुमच्यासारख्या हायली वेज्युकेटेड माणसाला आम्ही काय ते समजून देऊच. आजपासून एक स्कॉर्पिओ तुमची! बास!)
कळावे,
आपला विनम्र,
भंपकराव भुस्कुटे
(ता. क. : कृपया पेलिंग मिष्टेकला हासू नये. काळा रंग अजून आमच्या ष्टॉकमध्ये शिल्लक आहे.)
(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(17/10/10)

तर काय सांगत होतो वेळेवर साहेब, आपल्याला बिल्कुल आयड्या नव्हती का तुमीपन आपल्यातलेच आहात. राग मानून घेऊ नका साहेब, पण ना कदी तुमचा भगवा टिळा लावलेला फोटो पेप्रात बघितला ना कधी तुमी सायेबांच्या बंगल्यावर दिसलात.
तुमच्यासारख्या वेज्युकेशन क्षेत्रातल्या जंटलमन मानसांचे फोटो आमाला फक्त एकाच कामासाटी बगावे लागतात.. काळं फासन्यासाठी. (बाय द वे साहेब, आपण कुटल्या कालेजाचे प्रिन्शिपल वगैरे होता काय? नाय, चुकून कदी आपल्या हातून तुमच्या गालाला काळं फासलं गेलं अशेल, तर मिष्टेक माफ करावी. आपला पर्सनल काय नसतो. वरून आडर आली, फासा की आपण जाऊन फासतो. सैनिकाला आदेश म्हत्वाचा.) तर काय सांगत होतो मी, तुम्ही आपल्यातलेच आहात, याची मला काय आयड्या न्हवती. पण, छोट्या सायबांनी त्या पारोशा पारशाच्या पुस्तकावर हंगामा केल्याबराबर आपण जी काय वेळेवर अॅक्शन घेतली, ती बगून आपण एकदम खूष झालो. (‘पारोसा पारशी’ ही कोटी कशी वाटली, साहेब? आवल्डी ना? अहो, आमीपण मोठ्या साहेबांकडून बरेच बोलबच्चन शिकलेलो हाओत.) सगळे नियम फाट्यावर मारून तुमी डायरेक पुस्तकावर बंदीच घातली.. एकदम फुलष्टॉप. (आमच्या रांगड्या भाषेकडं जरा दुर्लक्ष करा साहेब, भावना समजून घ्या.) ताबडतोब आम्ही शाखाप्रमुखाला आडर केली, सायेबांसाठी सव्वाचारशेचा हार घेऊन जा आणि पाच किलो पेढे दे. (आल्ते ना साहेब ते? गोंड्याचा हार होता बघा फूलगल्लीतला आणि पेढे आपल्या पितरमलचे होते- मारवाड्याला आपल्या कोन्त्याबी पण्टरनी आपलं नाव सांगितलं की तो डायरेक पाच किलोचा बॉक्स काडतो.. गुडविलमदी.)
तर सांगत काय होतो की तुम्ही ही अॅक्शन घेतल्यामुळे आपण तर धाकट्या साहेबांना सांगून टाकलं की दस-याच्या मेळाव्यात वेळेवर साहेबाचा सत्कार झाला पायजे जनसागराच्या साक्षीनं. उद्या मंत्रालयावर भगवा फडकला की वेज्युकेशन मिनिष्टर पन आपले वेळेवर साहेबच झालेच पायजेत. साहेबांनी जी काय पॉम्ट अॅक्शन घेतली तिच्यामुळेच आपला मुंबईतला मराठी माणूस वाचणार आहे, त्याचबरोबर हिंदू धर्म वाचणार आहे, झालंच तर भारत देश त्या पाकड्यांपासून वाचणार आहे, होलसेलमदी सांगायचं, तर सगळी पृथ्वीच वाचणार आहे. (साहेब, हे जरा ज्यादाच आहे, याची मला पण कल्पना आहे. पण, आमच्या तीनपैकी कोनत्याही सायबानी काहीही केलं, तरी आम्ही येवढं सगळं बोलतोच. अहो, धाकट्या साहेबांनी आकाशातनं किल्ल्याचा फोटो काढला, तरी आम्ही हे सगळं पुराण लावतोच. तुम्ही तर खरोखरच सॉलिड काम केलंय.. हे लाष्टचं आपल्यातुपल्या प्रायवेटमध्येच बरं का!)
तर सांगत काय होतो वेळेवर साहेब, ही मुद्दा सोडून पाल्हाळ लावायची सवय मला मेळावा ऐकल्यापासून लागली. म्हण्जे आत्ता मी तुम्हाला सांगत होतो ते हे नाय, सांगत असं होतो की हा साला मेस्त्री. कुठे रंधा मारायचा तो मार. खिळे ठोक. पालिश कर. हे मेस्त्रीकाम सोडून बुक लिवायच्या फंदात कशाला पडला हा पारोसा पारशी? फुकट साला आमच्या छोटय़ा सायेबाच्या भेज्याला तरास? त्यांनी सोता बुक न वाचताच अॅक्शनचा इशारा दिला ती गोष्ट वेगळी! पण, बुक वाचायचा ठरवला असता तर त्यांना किती हेडॅक झाला असता?
ह्या गोष्टीवर- बरं का साहेब- मी तीन रात्र विचार केला. खोटा नाय. कुरकुंडेश्वरी मातेशपथ. तशी आपल्याला विचार करायची पॅक्टिस नाय. तरी पण आपण जोर लावून विचार केला की ह्या सगळ्या लफड्याचा मेन पॉइंट काय हाय?
अखेर आज सकाळी मशेरी लावून भांड्यावर बसलेलो असताना टूब पेटली आणि बाहेर आल्याबरोब्बर (हात सोच्छ धुवून) तुम्हाला लिहायला बसलो. अजून पैला चा पन पिलेलो नाही. तेव्हा पेलिंग मिष्टेक माफ करावी. तर सांगत काय होतो, की एक जण बुक लिवनार, आमचे साहेब ते न वाचता त्याच्यावर ऑब्जेक्शन घेनार, मग तुम्ही ते बॅन करणार, ह्या सगळ्या लफडय़ात मेन पॉइण्ट काय असंल, तर ते तुमचं विद्यापीट.
अहो, हे विद्यापीट नसतं तर ना तो मेस्त्री शिकला असता, ना त्याच्या डोस्क्यात बुकं लिवण्याचा किडा घुसला असता, ना फुडचा सगळा किचाट झाला असता. पॉइण्ट हाय का नाय साहेब? आपण काय वेज्युकेशनच्या विरोधात नाय. वेज्युकेशन नाय तर देशाचा पोग्रेस होणार नाय. शाळेत एबीसीडी, अबकड, तिसापर्यंतचे पाढेबिढे सगळ्यांना शिकवलं पायजे. पन सगळ्यांना पुढच्या शिक्षणाची गरज काय? कशाला ष्टुडंट लोकांनी असली घाणेरडी पुस्तकं वाचायची? काय ग्यान मिळणार आहे त्यातून? कॉम्प्युटर-बिम्प्युटर शिकवा. पेशंट कापायला शिकवा. पूल पाडायला शिकवा. असं बिनकामाचं शिक्षण काय उपयोगाचं? आता मला सांगा, आम्ही कुठं कालेज शिकलोय? पण, आज साहेबांच्या- तिन्ही साहेबांच्या बरं का- आशीर्वादानं आपल्या तीन स्कॉर्पिओ हायेत, दोन मारुत्या हायेत आणि होंडासिटी वेगळी. वेज्युकेटेड माण्साकडं हाये का हे सगळं? आणि हायर वेज्युकेशनने माणूस तुमच्यासारखा समजदार होईल याची गॅरंटी काय? मग नसती झंझट ठेवायची कशाला? तर मी काय सांगतो साहेब, छोट्या साहेबांचा आदेश आल्याबरोबर तुम्ही जसं ते बुक तडकाफडकी बॅन करून टाकलंत ना, तसाच आता फटाफट आणखी एक आदेश काढा आणि आपलं सरकार येईपर्यंत ते विद्यापीट बंद ठेवा.
(साहेब, नोकरीची चिंता करू नका. आमच्या शाळेवर तिसरी ‘फ’च्या शिक्षकाची जागा रिकामी आहे. पगार-बिगार सोडा हो. तुमच्यासारख्या हायली वेज्युकेटेड माणसाला आम्ही काय ते समजून देऊच. आजपासून एक स्कॉर्पिओ तुमची! बास!)
कळावे,
आपला विनम्र,
भंपकराव भुस्कुटे
(ता. क. : कृपया पेलिंग मिष्टेकला हासू नये. काळा रंग अजून आमच्या ष्टॉकमध्ये शिल्लक आहे.)
(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(17/10/10)
No comments:
Post a Comment