Sunday, May 27, 2012

सैनिक संरक्षणमंत्री!


'जनरलसाहेब, मला लढाऊ विमानातून फेरी मारायची आहे. ताबडतोब व्यवस्था करा.'

पण सरअसा धोका आम्ही पत्करू शकत नाही. आपण देशाचे संरक्षणमंत्री आहात.'

'म्हणून काय झालंमी सर्वात आधी या देशाचा एक साधा सैनिक आहेहे विसरू नका. मी लढाऊ विमानातून फेरी मारणारच!'

'ठीक आहेआपला आग्रहच असेल तर आमचाही नाइलाजच आहे. (टाळी वाजवून) कोण आहे रे तिकडे! संरक्षणमंत्री साहेबांसाठी एका मिग- 21 ची व्यवस्था करा ताबडतोब!'

'( चेहरा पांढराफट्ट पडतोजीभ गारठते) क्क्.. क्क्.. क्काय! मिग- 21...डोकं तर ताळ्यावर आहे ना तुमचं!'

'पणसर! या देशाचे साधे सैनिक मिग- 21 उडवतात. आणि आपणच तर आत्ता म्हणालात की आपण या देशाचे साधे सैनिक आहात.'

'म्.. म्.. म्.. म्हणून काय झालंमी या देशाचा संरक्षणमंत्री आहेहे विसरू नका.'

'( गालातल्या गालात हसूनटाळ्या वाजवून) कोण आहे रे तिकडे! संरक्षणमंत्री साहेबांसाठी सुखॉय विमानाची व्यवस्था करा.'

( एका जनरलच्या अलिखितअप्रकाशित डायरीतून)


(महाराष्ट्र टाइम्स)