Tuesday, March 8, 2011

एडमिशन

राज्यात सध्या सर्वत्र अॅडमिशनचा गोंधळ सुरू आहे. ( ' अॅडमिशनचा गोंधळ ' ही द्विरुक्ती आहे , असं काही विद्याथीर्मित्रांचं म्हणणं आहे.) कुठे किती सीट , त्यातल्या किती गव्हमेर्न्ट कोट्यातल्या , किती मॅनेजमेंट कोट्यातल्या , कुठल्या सीटला किती फी , किती पावतीचे , किती बिनपावतीचे , कुठे कधी प्रवेशपरीक्षा... या चरकातून पिळवटून जाताना विद्याथीर्बांधव इतके थकले आहेत की , आता अॅडमिशन्सना इतका उशीर झालाच आहे , तर हे वर्ष विश्ाांतीवर्ष घोषित करून पुढच्याच वषीर् अभ्यासक्रम सुरू करावा , अशी मागणी त्यांनी केली आहे. परीक्षा संपल्यानंतर ही सगळी माहिती गोळा करणं हा एक ' अभ्यास ' च असल्यानं आणि तिचा वापर करून प्रवेश मिळवणं ही ' परीक्षा ' च ठरत असल्यानं तिच्या ' पूर्वतयारी ' साठी अधिक वेळ मिळावा , अशीही काहींची मागणी आहे. ' प्रवेश कसा मिळवावा ?' या विषयावर ' प्रगती ' चे ' नवनीत ' पाजणारी गाइडं बाजारात येऊ घातले आहेत. ' काटे क्लासेस ' नं खास व्हेकेशन बॅचेसची घोषणा केली आहे.

या काळात कॉलेजांचा फेरफटका मारला तेव्हा ठिकठिकाणी , याद्यायाद्यांतून धारातीर्थी पडलेले विद्याथीर्वीर , 90 टक्के मिळवूनही अॅडमिशन न मिळाल्यानं धाय मोकलून रडणारी मुलं आणि त्यांच्याएवढाच सूर लावलेले पालक असं हृदय विदीर्ण करणारं दृश्य होतं. त्यात एक पालिका (म्हणजे स्त्री पालक) मात्र चक्क आनंदात दिसली. तिला विचारलं , ' मिळाली वाटतं अॅडमिशन ?'

' नाही हो! '

' नाही!!! आणि तरी तुम्ही इतक्या आनंदात कशा ?'

' अहो , नीट प्लॅनिंग केलं की रडायची पाळी येत नाही. '

' अरे वा! तुमच्यासारख्या धोरणी पालकांच्या अनुभवाचा फायदा आमच्या वाचकांना मिळायलाच हवा. जरा खुलासेवार सांगा ना! '

' अहो , आपले पालक ना फार पक्कं ठरवून ठेवतात की मुलाला/ मुलीला डॉक्टरच करायचं. किंवा त्याला/तिला इंजीनियरच करायचं. आम्ही मात्र आमच्या अर्णवला ' डॉक्टर किंवा इंजीनियर ' असा वाइस्स्ड चॉइस ठेवलाय. मेडिकल आणि इंजीनियरिंग , दोन्हीकडे गव्हन्मेर्ंट सीटचा फॉर्म भरून ठेवलाय. दोन्ही शाखांसाठी मॅनेजमेंट कोट्यातल्या सीटचीही पूर्वतयारी सुरू केली आहे. (म्हणजे , त्यातल्या बिनपावतीच्या हिश्शाच्या जमवाजमवीसाठी अर्णवच्या बाबांनी त्यांच्या बिझनेसमध्ये बिनपावतीचे पैसे गोळा करायला सुरुवात केली आहे.) त्यातूनही नाहीच झाली जमवाजमव , तर तीन बँकांशी कर्जाची बोलणी सुरू आहेत. एवढं करून नाहीच मिळाली मेडिकल किंवा इंजीनियरिंगला अॅडमिशन तर आम्ही अर्णवला काही फासावर नाही लटकावणार. महिनाभर उपाशी ठेवण्यापलीकडे आणि दिवसातून दोनदा मिरच्यांची धुरी देण्यापलीकडे कुठलीही क्रूर , निष्ठुर शिक्षा करणार नाही आहोत. शेवटी आपलंच मूल ते! त्या स्थितीचा विचार करून आम्ही त्याच्या बीएससीच्या अॅडमिशनचीही तयारी ठेवली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे , मेडिकल , इंजीनियरिंग आणि बीएससी या सगळ्यांच्या कोचिंग क्लासेसच्या अॅडमिशन घेऊन ठेवल्या आहेत. '

' कमाल आहे... कमाल आहे हो तुमची! ' डोळे पुसत दाटलेल्या कंठानं आम्ही आधी इतकंच बोलू शकलो. थोड्या वेळानं स्वत:ला सावरून पालिकाबाईंना म्हटलं , ' व्वा! म्हणजे अर्णवच्या अॅडमिशनची सगळी तयारी झालीच म्हणायची तुमची! '

' हो तर! आता फक्त एक अॅडमिशन राहिलीये. तेवढी एक घेतली की सुटले! '

' आता ही कोणती अॅडमिशन ?'

' केजीची. गेल्याच महिन्यात चालायला लागलाय ना तो!!!! '

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment