Monday, March 7, 2011

गुरुजी आणि धडपडणारी मुले


' दैनिक स्वर्ग समाचार' चा ताज्या अंकातला तो मथळा पाहताच गुरुजींचा आत्मा गहिवरला. त्यांचे डोळे पाणावले. हृदय भरून आले. आपल्या 'धडपडणाऱ्या मुलां' पैकी एक जण आज भरतभूच्या सेवेकऱ्यांतला एवढा मोठा मानकरी झाला आहे , हे वाचताना त्यांच्या मनात कृतार्थतेची भावना दाटून आली. खादीच्या रुमालाने डोळे टिपून ते त्या 'भावोत्कट' सोहळ्याचा पुढचा वृत्तान्त वाचू लागले.

अतिशय सामान्य परिस्थितीत , अतीव गरिबीत जन्मलेल्या या ' उपक्रमशील ' मुलानं मिळेल ती संधी साधून (याला काही नतदष्ट माणसे संधीसाधूपणा म्हणतात) धडपड धडपड धडपडत असामान्य यश कमावलं. गुरुजी बिचारे हयातभर गुरुजीच राहिले , पण हा धडपडणारा मुलगा मात्र साध्या कारकुनाचा ' सर ' झाला , सरांचा ' प्रिन्सिपॉल ' झाला , ' प्रिन्सिपॉल ' चा 'स्पीकर' झाला. (शिवाय हॉटेल उद्योजक , बिल्डर , माजी मुख्यमंत्री , माजी केंदीय मंत्री अशीही त्याची अन्य बिरुदावली आहेच.)

(महाराष्ट्र टाइम्स)

आणि या मुलाचे गुण तरी किती ? त्याच्या दैनंदिनीचा प्रकाशन समारंभ म्हणजे त्याच्यासारख्याच इतर सुशील आणि धडपडणाऱ्या मुलांची मांदियाळीच होती. त्यांनी त्याच्यावर स्तुतीपर विशेषणांचा वर्षावच केला होता. एकनिष्ठ इमानी (काही नतदष्ट माणसं याला लोचटपणा , लुब्रेपणा , लाचारी म्हणतात) , माणुसकीचा झरा (न.द. म्हणतात- घरच्या ' माणसां ' च्या उत्कर्षासाठीचा आटापिटा म्हणजे यांची माणुसकी) कर्तबगार (न.द. प्रतिशब्द: उचापत्या) , आदर्श राजकारणी पुरुष (न.द. इथे निरुत्तर , कारण आजकाल हेच आदर्श!) अशा विशेषणांचा पाऊसच पडला त्या सोहळ्यात. एका महत्त्वाच्या पदावरच्या , विशेष काहीही न घडलेल्या , केवळ वर्षभराच्या कारकिदीर्तल्या नीरस घडामोडींची ही जंत्रीवजा डायरी. तिच्या प्रकाशनाचा थाटमाट आणि रुबाब असा की , तो पाहून उपस्थितांमध्ये ' डायरिया ' ची साथ यावी. (या साथीची लक्षणं स्तुतीपर विशेषणांच्या वर्षावात दिसलीच.)

खास काहीही न करता सर्वानुमते सर्वगुणसंपन्न ठरलेला आपला हा विद्याथीर् आहे तरी कोण , या उत्सुकतेनं गुरुजींनी अंकातलं छायाचित्र पाहिलं...

... पुन:पुन्हा , नीट निरखून पाहिलं. पण काहीकेल्या ओळख पटेना!

' आपल्या ' वर्गा ' त तर कधीच दिसला नव्हता हा मुलगा! मोठी झाली की किती बदलतात ना मुलांचे चेहरेमोहरे! ' असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांच्या मागून वृत्तपत्रात डोकावणाऱ्या दुसऱ्या स्वर्गस्थ आत्म्याने हा विचार ओळखला आणि म्हणाला , ''गुरुजी! घोटाळा तुमचा नाही, र्मत्यलोकातल्या खुशामतखोर पुढाऱ्यांचा आहे. हा 'धडपडणारा मुलगा' आहे खरा , पण तो तुमच्या वर्गातला नाही , तर हिंदुहृदयसम्राटांच्या 'तालमी'तला!''

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment