( सदरहू मजकूर पूर्णपणे काल्पनिक असून त्यातील घटना व पात्रे यांचे वास्तवातील व्यक्ती व प्रसंगांशी सार्धम्य आढळल्यास तो मनमोहन देसाईकृत सिनेमांप्रमाणे विलक्षण योगायोग मानावा.)
अध्यक्षमहाराज , मी या सदनाचा सदस्य या नात्याने आपल्या असे लक्षात आणून देतो आहे की सध्या काही व्यक्तींच्या बेमुर्वतखोर वर्तनामुळे सदनाची प्रतिष्ठा धुळीस मिळू लागली आहे... अध्यक्षमहाराज, कृपया माझ्यासकट सर्व सदस्यांकडे डोळे वटारून पाहू नका, मी या सदनाबाहेरच्या व्यक्तींच्या वर्तनाविषयी आपल्याकडे तक्रार करतो आहे.
आमचे पद , त्याची प्रतिष्ठा, त्याचा दबदबा आणि आमचे हक्क यांचा जराही मुलाहिजा न ठेवता काही फडतूस जनसामान्य मनमानी पद्धतीने वागत आहेत, याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. दर पाच वर्षांनी आम्ही या दळभदी लोकांकडे मते मागायला जातो, तेव्हा त्यांच्याशी गोड बोलतो, त्यांची कामेदेखील करून देतो, त्यावर त्यांची ही मिजास चालते. काहीतरी करून आमची पदे तहहयात करण्याची व्यवस्था करावी, म्हणजे हा पंचवाषिर्क त्रास आम्हाला होणार नाही.
अध्यक्षमहाराज , आमच्या नावात 'आम' असले, तरी आम्ही 'खास' आहोत, हे या लोकांच्या टाळक्यात कसे येत नाही, याचे मला मोठे नवल वाटते. तरी आपल्याला एक शिंग असून, चार हात आणि चार पाय आहेत, अशा आविर्भावात आम्ही सर्वत्र वावरत असतो बरं का यांना लक्षात यावे म्हणून. आमच्या एका फोनसरशी सरकारी हपिसांत तुंबलेली कामे मोकळी होतात, पोलिसी कचाट्यात अडकलेले 'कार्यकतेर्' मोकळे होतात. आम्ही येणार म्हणताच गावोगावचे रस्ते दुरुस्त होतात, रंगरंगोटी होते. आमच्या दरबारात पंचक्रोशीतले सगळे कंत्राटदार रूमालात हात बांधून हजेरी लावतात. ही आमची ताकद. या सदनाने आम्हाला केवढे तरी हक्क दिले आहेत... ते लोकांचे प्रश्ान् मांडण्यासाठी दिले आहेत, असे काही अडाणी लोक बोलतात. पण, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आमचे सगळे हक्क जाऊ तिथे 'बजावत' असतो.
दुदैर्वाने या हक्कांची काही सामान्य माणसांना जाणीवच नाही. मग आम्हाला कुणाच्या तरी कानफटात मारून ती जाणीव करून द्यावी लागते. कोणत्याही कारणाने किंवा कारणाशिवाय कुणाच्याही कानफटात लगावण्याचा हक्क आम्हाला , आम्ही राजकीय कार्यकतेर् झालो त्याचवेळी आपोआप बहाल झाला आहे, याची या येडपटांना जाणीवच नाही.
परवा त्या कोण कुठल्या बाई... त्यांनी आम्हाला भेट नाकारली. अरे , सरकारी अधिकारी असलात म्हणजे काय झाले? सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्यासमोर, आम्ही सांगू त्या वेळेला हजर राहून आम्ही बोलू त्या गोष्टीला 'येस सर' म्हणून मान हलवून दुजोरा द्यायला हवा. त्यासाठीच तर त्यांची नियुक्ती आहे. आम्ही लोकनियुक्त राजे आहोत, हे या अधिकाऱ्यांनाही लक्षात येत नाही! यांच्या सगळ्या परीक्षांची फेररचना करून त्यांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून द्यायला हवी... म्हणजे हक्क आमच्याकडे आहेत आणि कर्तव्ये त्यांच्याकडे, हे नीट शिकवायला हवे.
या बाईंमध्ये काहीतरी 'मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट' आहे, हे मी याआधीच सदनाच्या निदर्शनाला आणून दिले आहे आणि तो सदनातच दुरुस्त करून देण्याची तयारीही दर्शवली आहे... बाईंनी घाबरून जाण्याचे कारण नाही... त्यांचा डिफेक्ट दुरुस्त होण्यातला आहे, याची मला खात्री आहे...
... त्यांच्यातला 'मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट' असाध्य, कधीही बरा न होणारा असता, तर त्या आमच्यासारख्या 'नामदार' नसत्या का झाल्या!

No comments:
Post a Comment