Saturday, March 2, 2013

न-कथा क्र. 5 : बाप
``मुलगी झाली, मुलगी,'' नर्सने येऊन आनंदाचा लवलेशही नसलेल्या सुरात सांगितलं, तेव्हा त्याला खचायलाच झालं. शेजारच्या बाकडय़ावर बसलेली आई फणकाऱयाने उठून बाहेर निघून गेली. मांडीवर डोकं ठेवून झोपलेली थोरली थोडीशी चुळबुळली आणि पुन्हा शांत झाली. दुपटय़ात गुंडाळलेल्या त्या छोटय़ाशा जिवाकडे पाहायचंसुद्धा नाही, असा निर्धार केलेला असताना त्याच्या तोंडातून मात्र `बच्चा' ही नेहमीची हाक आपसूक निघून गेली. ओळखीची हाक कानी आल्यावर तिचं ते टुकूटुकू इकडेतिकडे बघणं पाहताना मन कधी हरखून गेलं, हे त्याला कळलंच नाही...No comments:

Post a Comment