Saturday, March 2, 2013

न-कथा क्र. 3 : जाग
``ओढा रे ओढा त्याला...''
``फेडा त्याची कापडं...''
``घ्या त्याला आटय़ात...''
``चोपा साल्याला...''
फेसबुकवर हाळय़ा घुमल्या आणि सगळय़ांनी महालेखकावर शब्दशस्त्रं परजली. कोणी त्याच्या कादंबऱयांची रेवडी उडवली, कुणी त्याच्या कवितेच्या चिंध्या केल्या, कोणी त्याच्या समीक्षकी लेखनाची कणीक तिंबली. कोणी त्याच्या व्यक्तिगत चारित्र्याचं हनन केलं, कोणी त्याच्या वाङ्मयीन प्रतिमेचं मनोमन दहन केलं. संध्याकाळी सुरू झालेला हा हैदोसदुलाबेधुल्ला उत्तररात्री संपवून सगळे योद्धे जणू रतिक्लांतसे श्रांत मनाने कृतार्थभावे झोपी गेले तेव्हा महालेखकाचे पुस्तक नुकतेच संपवून अंतर्बाहय़ थरारलेला, थिजलेला, स्तिमित झालेला वाचक टक्क जागाच होता…No comments:

Post a Comment