Saturday, March 2, 2013

न-कथा क्र. 2 : दिलासा


``आजही काही नाही मिळालं, आजही सगळी दुकानं बंद आहेत. तीन दिवसांचा दुखवटा आहे, म्हणतात,'' बापाने हातातल्या रिकाम्या पिशव्या खोलीच्या कोपऱयात भिरकावून सांगितलं, तेव्हा कोमेजलेली पोरं मुसमुसू लागली. ``गप्प बसा रे, गप्प बसा,'' बाप कळवळून म्हणाला, ``नशीब समजा महानेता म्हातारपणामुळेच मेला. त्याला कुणी गोळय़ा घातल्या असत्या तर आतापर्यंत मुडदे पडले असते आपले.''


No comments:

Post a Comment